sanjay raut and sharad pawar interview

संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची मुलाखत

न्यूज ऑफ द डे राजकारण

देशाच राजकारणात खळबळ उडणार संजय राऊत यांचा दावा

मुंबई : ‘सामाना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत sanjay raut यांनी आज शरद पवार sharad pawar  यांची मुलाखत घेतली असून पवारांनी अनेक प्रश्नांची त्यात उत्तरे दिली आहेत. त्यामुळे देश आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ही मुलाखत खळबळ माजवेल, असा दावा संजय राऊत यांनी ट्विटमध्ये केला आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये तणाव असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यात फडणवीस यांनी एका युट्यूबवरील मुलाखतीत शरद पवारांनी भाजपला पाठींबा देऊ केला होता. दोनवेळेस चर्चाही झाल्या, असे म्हटले होते. या राजकीय चर्चेच्या अनुषंगाने राऊत यांनी पवारांची घेतलेली ही मुलाखत नक्कीच लक्षवेधी ठरणार असल्याचे दिसत आहे. ही मुलाखत लवकच ‘सामना’त प्रसिध्द होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Tagged