JILHA KARAGARAH

बीड जिल्हा कारागृहातील 34 आरोपींना जामीन

कोरोना अपडेट क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

तात्पुरता जामीन मंजूर केल्याची जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांची माहिती

बीड :  येथील जिल्हा कारागृहातील 34 आरोपींना तत्पुरता जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे कारागृहातील कैद्यांची संख्या कमी झाली असून यामुळे कोरोना सारख्या माहमारीचा फैलाव रोखण्यास मदत होणार आहे. 

      कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर कारागृहातील कैद्याच्या आरोग्याची काळजी घेणे अतिशय जिकीरीचे झाले होते. जिल्हा कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी होते. कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त बंदीवान आहेत. त्यामुळे सामाजिक अंतर व अन्य आवश्यक उपाययोजना करणे कठीण होते. तसेच कोरोनाचा संसर्ग होण्याची अधिक भिती होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उच्च न्यायालयाने समिती स्थापन करून गंभीर गुन्हे वगळता इतर आरोपींना तात्पुरता जामीन देण्याच्या अनुषंगाने सूचित केले होते. सर्वोच्च न्यायालयाने तत्पुरता जामीन देण्याबाबत यापूर्वीच सुचना दिल्या होत्या. तुरूंगाधिकारी यांच्या अवाहनाला प्रतिसाद देत प्रमुख जिल्हा न्यायाधीश हेमंत शं.महाजन यांनी न्यायाधीशांना परिस्थितीचे गांर्भीय लक्षात आणुन दिले व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड यांनी आरोपीना तात्काळ कायदेशीर मदत पुरवून त्यांचे जामीन अर्ज प्राप्त करून संबंधित न्यायालयाकडे सादर केले. त्या अनुषंगाने 93 आरोपींचे जामीन अर्ज जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाने संबंधित न्यायालयात दाखल केले होते. न्यायालयाने 34 आरोपींना तात्पुरता जामीन मंजुर केला आहे. त्यामुळे कारागृहातील आरोपींची संख्या कमी होवून कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यास मदत होणार आहे. या कामी वकील वर्ग, तुरूंगाधिकारी व न्यायाधीश वर्ग, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव शरद गो. देशपांडे यांनी दिली आहे.

Tagged