CORONA

बीड जिल्हा : तब्बल 83 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट


बीड, दि.2 : बीड जिल्हा आज चांगलाच हादरला आहे. आज तब्बल 83 स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. 6 स्वॅब अनिर्णित असून 6 स्वॅब नाकारण्यात आले आहेत. तर 453 स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 868 झाली आहे.त्यात 428 जण बरे झालेले आहेत. आतापर्यत 28 जण जिल्ह्यात तर 4 जणांचा बाहेर जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण धरून आता 408 जणांवर जिल्ह्यात उपचार सुरु झाले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये सर्वाधिक परळीचे 36 जण असून त्या खालोखाल बीडचे 20, अंबाजोगाई 8, गेवराई 7, पाटोदा 4, माजलगाव 2, केज 2, धारूर 2, वडवणी 1 व शिरूर तालुक्यातील एकाचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेल्यांची यादी पहा….

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged