ANTIGEN TEST

बीड जिल्हा : आजचा कोरोना शंभरीपार

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

गेवराईच्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 28, तर अंबाजोगाईच्या लॅबमधून 80 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

बीड, दि.5 : बीड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा बुधवारी 108 वर पोहोचला. गेवराईत केलेल्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 28 जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. तर अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या स्वॅबमध्ये 80 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे आता बीड जिल्ह्याची रुग्णसंख्या 1145 वर जाऊन पोहोचली आहे. यात बाहेर जिल्ह्यात मृत्यू झालेल्या व तिकडेच पोर्टलवर नोंद असलेल्या 4 जणांचा देखील समावेश आहे.
केजमध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू
जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. आत्तापर्यंत 37 जणांचा मृत्यू झाला. शहरातील अजीजपुरा भागातील 55 वर्षीय इसमाचा बुधवारी सकाळी अंबाजोगाईच्या रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सदरील इसम आडस येथे ग्रा.पं.कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यामुळे जिल्ह्याची मृत्यूसंख्या आता 39 झालेली आहे. यात विविध जिल्ह्यात उपचारादरम्यान मृत झालेल्या 4 जणांचाही समावेश आहे.

प्रशासनाकडून आज जाहीर झालेली यादी खाली पहा…

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged