बीड दि.21 : कोरोना बाधितांना बेड मिळत नाहीत. एवढी परिस्थीत गंभीर असतानाही नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत. कडक लॉकडाऊन करण्याची वेळ आली तरी आकडेवारी मात्र कमी होताना दिसत नाही. बुधवारी (दि.21) जिल्ह्यात 1 हजार 47 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
आरोग्य विभागाला बुधवारी (दि.21) चार हजार 576 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार 47 जण बाधित आढळून आले असून 3 हजार 529 जण निगेटिव्ह आले आहेत. या बाधीतांमध्ये अंबाजोगाई 176, आष्टी 124, बीड 223, धारूर 43, गेवराई 101, केज 125, माजलगाव 48, परळी 90, पाटोदा 51, शिरूर 35 आणि वडवणी तालुक्यात 31 रूग्ण आढळून आले आहेत.
तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी