dharur axident

चोरांबा थेटेगव्हाण येथे तिहेरी अपघात; दोघे गंभीर जखमी

क्राईम धारूर न्यूज ऑफ द डे

किल्लेधारुर /सचिन थोरात
दि.10 : खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गा वर चोंराबा ते थेटेगव्हाण दरम्यान कार टमटम व दुचाकी आशा तीन वाहनांचा अरूंद रस्त्यावर सोमवारी दुपारी तिहेरी अपघात झाला. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून या अरुंद घाट रस्त्यावर होत असलेल्या नियमित अपघातामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
धारूर तेलगाव दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर धुनकवड पाटी ते धारूर दरम्यान घाट अरूंद रस्ता ठेवला आहे. जुन्याच रस्त्यावर डांबरीकरण करून रस्ता चकाचक केला आहे. माञ वाहनाचा वेग व वर्दळ वाढल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. धारूर घाटात रविवारी दुपारीच अपघात झालेला असताना सोमवारी दुपारी चोरांबा ते थेटेगव्हाण दरम्यान राधीका हॉटेलसमोर स्विफ्ट डीझायर (एम.एच. 26 ए.एफ 3358) मालवाहतूक पीकअप (एम.एच.49 ए.टी. 2382) व मोटरसायकल (क्र.एम.एच.25 झेड. 4587 या तीन वाहनांचा तिहेरी अपघात झाला. यामध्ये मोटरसायकल वरील दोघेही गंभीर जखमी झाले असून त्या दोघांना अंबाजोगाई स्वाराति रुग्नालयात दाखल करण्यात आले असून या घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक पालवे हे पोहचले होते.
नियमित अपघात, आमदार, खासदारांचे दुर्लक्ष
धारूर घाट हा अरुंद असून घाटातील वळणेही धोकादायक आहेत. धुनकवड ते धारूर दरम्यान रस्ता अरुंद ठेवल्याने अपघात नियमित होत आहेत. मागील दोन वर्षात या मार्गावर शेकडो अपघात झाले असून अनेकांना प्राणास मुकावे लागले आहे. तर अनेकजण कायमचे जायबंदी झाले आहेत. स्थानिकचे आमदार व खासदार या महत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत.

आमचा व्हॉटसअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Tagged