JAYAKWADI, NATHSAGAR

‘नाथसागर’ इतके टक्के भरले

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

पैठण, दि.10 : मराठवाड्याची तहान भागविणारे नाथसागर जलाशय 56.66 टक्के भरले आहे. त्यामुळे ऊसउत्पादकांसह, शहरातील पाणी पुरवठा व उद्योगांच्या चिंता किमान वर्षभरासाठी मिटल्या आहेत.
जायकवाडी धरणाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार जायकवाडी धरणाची सायंकाळी सहा वाजताची पाणी पातळी 1513.03 फूट (461.192 मीटर) होती. तर धरणातील पाण्याची आवक 3171क्युसेक होती. धरणाचा एकूण पाणीसाठा 1968.187 दलघमी असून जिवंत पाणी साठा 1230.081 दलघमी झाला आहे. अशाप्रकारे 56.66 टक्के भरले आहे.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged