uddhav

गुगल क्लासरूम वर शिक्षण देणारे महाराष्ट्र देशात पहिले राज्य

करिअर देश विदेश न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

मुंबई: कोरोनाच्या परिस्थितीत सध्या अधिक धोका महाराष्ट्रात आहे, त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील शाळा बंद आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये; यासाठी राज्य सरकारनं महत्वाचे पाऊल टाकले आहे. राज्यातील शाळा ‘गुगल क्लासरूम’च्या माध्यमातून सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने गुगलशी करारही केला आहे.

या प्रकल्पाचे गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड, गुगलचे भारतातील विक्री प्रमुख संजय गुप्ता यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांना आता कोणत्याही ठिकाणावरून शिक्षण घेणे सुलभ होणार आहे.

शिक्षकांसाठी देखील फायदेशीर

विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याबरोबरच शिक्षकांना या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सराव घेणे तसेच प्रकल्प देऊन त्यांचे मुल्यमापन करणेही या प्रकल्पामुळे सुलभ होणार आहे. सुमारे दीड लाख शिक्षकांनी या माध्यमाचा वापर करण्यासाठी नोंदणी केली आहे.

महाराष्ट्राला प्रगतीशील राज्य बनविण्याचे लक्ष्य…

दरम्यान, सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन महाराष्ट्राला शिक्षणातील सर्वात प्रगतीशील राज्य बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे मत वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.

Tagged