माहीपाठोपाठ सुरेश रैनाचीही क्रिकेटमधून निवृत्ती

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड मनोरंजन

मुंबई : भारतीय संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या सेवानिवृत्तीपाठोपाठ सुरेश रैनाने सुद्धा निवृत्ती जाहीर केली आहे. इन्स्टाग्राम पोस्टमधून रैनाने मीसुद्धा तुझ्या प्रवासात तुला साथ द्यायचा निर्णय घेतला आहे, असं म्हणत रैनाने क्रिकेटला अलविदा केला आहे. मधल्या फळीतला भरवशाचा फलंदाज आणि संघाच्या गरजेनुसार ऑफस्पिन बॉलिंग करून यश मिळवणारा रैना एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता.

कर्णधार असताना धोनीने रैनाच्या या गुणांना हेरून त्याचा चांगला उपयोग करून घेतला होता. आता धोनीने निवृत्ती जाहीर केल्याच्याच दिवशी रैनानेही तीच वाट धरली आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या काही खेळी लक्षात राहणाऱ्या आहेत. वन डे वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघात त्याचं स्थान लक्षात राहण्यासारखं होतं. त्याने त्या स्पर्धेत महत्त्वाची कामगिरी बजावली होती. आता धोनीबरोबरच रैनाने सुद्धा क्रिकेट संन्यास जाहीर केल्याने क्रिकेट चाहत्यांना आणखी हुरहूर लागली आहे.

Tagged