sonography center

पैठणमध्ये 800 रुपयांच्या सोनोग्राफीसाठी 1300 रुपयांचे शुल्क

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे मराठवाडा

डॉक्टरांच्या संगनमताने गरोदर महिलांची लूट

चंद्रकांत अंबिलवादे । पैठण

पैठण शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून सोनोग्राफीच्या सेंटरवर कुठल्याही अधिकार्‍याचे नियंत्रण नसल्यामुळे येथील डॉक्टरच्या संगनमताने गरोदर मातेची कलर सोनोग्राफीच्या नावाखाली राजरोसपणे लूट केली जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे कष्टकरी शेतकरी मजूर नागरिकांना दिवसेंदिवस आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करावे लागत आहे.
प्रत्येक आई-वडील आपल्या मुलीचे बाळंतपण निर्विघ्न व सुखरूप होण्यासाठी चांगल्या स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरकडे धाव घेतात. मात्र संबंधित डॉक्टर रुग्णांना कुठलीही दयामाया न दाखवता तो घाबरून जाईल असे दोन चार प्रश्न विचारतात. त्यानंतर गर्भवती मातेला तत्काळ सोनोग्राफी करण्याचे सल्ला देऊन वैशिष्टपूर्ण सोनोग्राफी सेंटरची शिफारस करतात. सदरील गर्भवती माता या सोनोग्राफी सेंटरवर गेल्यावर सदरील मातेकडून सोनोग्राफीसाठी 800 रुपये शुल्क असतांना कलर
सोनोग्राफीच्या नावाखाली 1300 रुपये शुल्क आकारण्यात येते.

800 रुपयांऐवजी चक्क 1300 रुपये शुल्क आकारण्यात येत आह

दैनिक कार्यारंभ प्रतिनिधीने पैठण शहरातील अस्तित्वात असलेल्या सगळ्या सोनोग्राफी सेंटरवर प्रत्यक्ष भेट देऊन सोनोग्राफीचे दर जाणून घेतले असता काही सोनोग्राफी सेंटरवर 700, 800, 900, 1300 रुपये अश्या पद्धतीने शुल्क आकारले जाते. मात्र काही सोनोग्राफी सेंटरवर कुठलाही दर पत्रक (सेवा शुल्क) फलक लावण्यात आलेले नाही.

रुग्णांना दिलेली हीच ती पावती


याबाबत काही सोनोग्राफी सेंटरचालकांकडेच खासगीत चौकशी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. सोनोग्राफी सेंटरमध्ये येणार्‍या प्रत्येक गरोदर माताचे सोनोग्राफी पाठीमागे संबंधित डॉक्टरचे कमिशन ठरलेले असते. त्यामुळे सोनोग्राफीचे प्रत्येक ठिकाणी दर वेगवेगळे आहेत. हे कुठल्या एका सोनोग्राफी सेंटरवर नसून पैठण शहरात अनेक सोनोग्राफी सेंटरवर हाच प्रकार सुरु आहे. ज्या सोनोग्राफी सेंटर 700 पेक्षा जास्त शुल्क आकारले जाते त्यांना अशी लूट करू नका, अशी विनंती केली असता त्यांनी रुग्णांना उध्दटपणे उत्तरे दिली. “रेट ठरविणारे आमचे डॉक्टर आहेत. त्यांनी सांगितले कमी करा तर आम्ही करू. यात आम्हाला काय मिळतं? डॉक्टरांचं कमिशन यात ठरलेलं असतं”, असेही काही सोनोग्राफी सेंटरवरून ऐकायला मिळालं.

जिल्हाधिकारी, आरोग्य विभागाने लक्ष घालावे
सोनोग्राफी सेंटरवर कुठल्याही अधिकार्‍याचं नियंत्रण नसल्याने गरोदर मातेची दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणावर डॉक्टरच्या संगनमताने लूट केल्या जात आहे. या गंभीर बाबीतकडे जिल्हाधिकार्‍यांनी व आरोग्य विभागाने लक्ष देऊन रुग्णांची होणारी लूट थांबविण्याची मागणी होत आहे.

Tagged