daroda, gharfodi

महिलेचा गळा दाबून, हातावर चाकुचा वार करीत लूट

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी

परळीतील घटना

परळी, दि.13 : घरात आपल्या पती व मुलांसह झोपलेल्या महिलेचा गळा दाबून हातावर चाकुचा वार करत कपाटातील नगदी 80 हजार व तीन तोळे तीन ग्रॅमचे सोन्याचे दागिने असा 2 लाख 12 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. शहरातील मध्यवर्ती असलेल्या पंचवटी नगर भागात घडल्याने नागरीकांमध्ये दहशत पसरली आहे.
बालाजी फड हे आपली पत्नी व दोन मुलांसह शहरातील पंचवटी नगर भागात राहतात बुधवार दि.12 रोजी रात्री 12.30 च्या सुमारास घरात सर्वजण झोपलेले असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करत कपाटाचे कुलूप तोडले या आवाजाने अश्विनी फड यांना जाग आली असता एका चोरट्याने त्यांचा गळा दाबून हातावर चाकुने वार केला व अंधाराचा फायदा घेवून चोरटे पसार झाले. या प्रकाराने सर्व कुटुंब जागे झाल्यानंतर कपाटातील सामान बाहेर अस्ताव्यस्त पडलेले दिसले झालेला प्रकार परळी शहर पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. याबाबत अश्विनी फड यांच्या फिर्यादीवरुन कपाटातील नगदी 80 हजार तीन तोळ्याचे गंठण व तीन ग्रॅमची अंगठी असा एकूण 2 लाख 12 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परळी शहर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेले पंचवटी नगर व पोलिस अधिकार्‍याच्या सरकारी क्वार्टरच्याा समोरच हे घटनास्थळ आहे. पोलीस अधिकार्‍यांचे या ठिकाणी निवस्थान असल्याने घरफोडी करणार्‍या चोरांचे पोलिस अधिकार्‍यांनाच एकप्रकारे अव्हान दिले आहे.

Tagged