chori, gharfodi

डिंकवडा खात चोरट्यांनी बेचाळीस हजाराचा ऐवज लांबवला

क्राईम धारूर न्यूज ऑफ द डे

धारूर, दि.13 : शहरातील लक्ष्मी नगर भागात जन्माष्टमीनिमीत्त सर्व कुटुंबीय गावी गेल्याचे पाहुन चोरट्यांनी घरातील डबे उचकटुन पाहात त्यातील डिंक वडा खात घरातील रोकड, सोने चांदीच्या दागीन्यासह बेचाळीस हजाराचा ऐवज लांबवला असल्याची घटना धारूर येथे घडली.

शहरातील लक्ष्मी नगरमध्ये राहणार्‍या वैशाली लाखे यांनी दिलेल्या तक्रारीत बुधवारी (दि.12) गावी गेल्यावर चोरट्यांनी लोखंडी गेटचे कुलूप तोडून घरातील धान्याच्या कोठीत ठेवलेले नगदी पैसे, सोन्या चांदीचे दागीने मिळून बेचाळीस हजाराचा ऐवज चोरी झाली केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोवींद बास्टे करीत आहेत. दुसर्‍या घटनेत श्री.तपसे यांचेही घर फोडले आहे मात्र तपशील उपलब्ध झला नाही.

Tagged