मोर्चाला विरोध करणार्‍यानो काळ तुम्हाला माफ करणार नाही- रमेश पोकळे

न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.4 : 2015 मध्ये मी सत्ताधारी भाजप पक्षाचा जिल्हाध्यक्ष होतो. पण मराठा समाजाला आरक्षण मिळावेे म्हणून बैठका सुरु झाल्या. तेव्हा मी त्यामध्ये सहभागी होतो. पक्षाची काहीही भूमिका असो. पक्ष भूमिका घेईल न घेईल मला माहित नाही. पण एक मराठा म्हणून मी नेहमी समाजासोबत राहिलो. राजकारण करु नका म्हणणारी काही लोकं या मोर्चाला विरोध करत होती. कुणाचं ऐकून तुम्ही मोर्चाला विरोध करत आहात, येणारा काळ तुम्हाला माफ करणार नसल्याचे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी म्हटले आहे.

बीड येथे शनिवारी (दि.5) मराठा क्रांती संघर्ष मोर्चा हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मंचावर उपस्थित भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे बोलत होते. पुढे पोकळे म्हणाले की, मी सत्ताधारी पक्षाचा जिल्हाध्यक्ष होतो. तेव्हा मराठा आरक्षणासाठी बैठका होत होत्या. मी पण त्यात पुढाकार घेतला. राजकीय जोडे बाहेर काढून समाजासाठी मार्चात सहभागी झालो. पक्ष पक्षाची भूमिका घेईल पण एक मराठा म्हणून समाजासोबत राहणे हे कर्तव्य आहे. राजकारण करु नका म्हणणारी काही लोकं या मोर्चाला विरोध करत होती. नेमकं कुणाच्या सांगण्यावर ती मोर्चाला विरोध करत आहे, याचं भानही त्यांना आहे का? आज ज्यांनी विरोध केला, त्यांना काळ माफ करणार नाही. आजची ही मोर्चाची हाक मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी महत्वाची ठरणार असल्याचेही रमेश पोकळे म्हणाले.

Tagged