नाथसागरातून 2637 क्युसेक पाण्याचा गोदावरी नदीत विसर्ग

न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

पैठण धरण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

पैठण  : येथील नाथसागर धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर जलसाठा निर्माण झाला आहे. यामुळे शनिवारी (दि.5) दुपारी गोदावरी नदीमध्ये अभियंता दिलीप तवार, प्रभारी अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे उपविभागीय अभियंता शिरसाट, सहाय्यक अभियंता संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे, कनिष्ठ अभियंता राजाराम गायकवाड, खराडकर, बंडू अंधारे यांच्या हस्ते धरणाची एकूण 27 दरवाजांपैकी दोन दरवाजे उघडण्यात आले. द्वार क्रमांक 10 व 27 ही दोन दरवाजे अर्धा फुट उघडून गोदावरी नदीमध्ये 1589 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
      दोन दरवाजे उघडल्यामुळे आता गोदावरी पात्रात जलविद्युत केंद्र व सांडव्या द्वारे एकूण 2 हजार 637 विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गोदावरी नदीवर असलेल्या हिरडपुरी, शहागड, घनसावंगी या परिसरातील छोट्या मोठे बंधारे जवळपास 99 टक्के भरल्याची स्थिती आहे. या गोदावरी नदीवर झालेला पाण्याचा विसर्ग दूर पर्यंत जाणार आहे. नाथसागरातुन पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे धरण पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. यावेळी पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप, रामकृष्ण सागडे, संतोष माने, सहाय्यक फौजदार नामदेव कातडे, पोलीस नाईक ताराचंद गव्हाणे, गोविंद नाईक, दिनेश चव्हाण यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.