बीड : बीड तालुक्यातील हिरापुर येथील तलाठ्यासह खाजगी इसमावर लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि.15) सायंकाळच्या सुमारास केली.
लक्ष्मण सुखदेव ओव्हाळ (तलाठी सज्जा हिरापुर) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. त्याने तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचेची मागणी केल्याप्रकरणी तलाठी लक्ष्मण सुखदेव ओव्हाळ, खाजगी इसम नितीन बाबासाहेब गव्हाणे (रा.हिरापुर) यांच्यावर लाचेची मागणी केल्याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार, उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.रविंद्र परदेशी व बीडच्या टिमने केली. या कारवाईमुळे महसुल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
