बांध नांगरण्यावरून कुर्‍हाडीने मारहाण

केज न्यूज ऑफ द डे

केज : तालुक्यातील कोडेवाडी येथे शेत नांगरणी करीत असताना बांध नांगरल्याच्या कारणावरून दोन शेतकर्‍यांत भांडण होऊन एकास कुर्‍हाडीने मारहाण करण्यात आली असून एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोरडेवाडी येथे गोविंद शिवगीर गिरी यांच्या शेजारी जालिंदर गिरी यांची जमीन आहे. आज दि. 21 जून रोजी दुपारी 2 वाजता जालिंदर गणेश गिरी, संजय जालिंदर गिरी, समाधान उर्फ राजू गिरी हे ट्रॅक्टर क्र एमएच-42/एफ-1403 या ट्रॅक्टरने त्यांनी सार्वजनिक बांध नांगरला त्यावेळी गोविंद गिरी हे त्यांना बांध नांगरु नका म्हणाले असता वरील तिघांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली तसेच जालिंदर गिरी यांनी हातातील कुर्‍हाड डाव्या डोळ्याच्या वर मारून जखमी केले. आणि हातातील दगड मारून जखमी केले. तसेच त्यांचा नातू प्रभुराम अशोक गिरी यालाही जखमी केले. या प्रकरणी गोविंद शिवगीर गिरी यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस स्टेशनला जालिंदर गिरी, संजय गिरी, समाधान उर्फ राजू गिरी आणि दैवशाला गिरी या चौघां विरुद्ध गु.र.नं.229/2020 भा.दं.वि.324, 323, 504, 506 व 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल बालकृष्ण मुंडे हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान जालिंदर गिरी यांनीही गोविंद गिरी, कृष्णा गिरी, भागवत गिरी आणि अशोक गिरी या चौघांनी कुर्‍हाडीच्या दांड्याने मारहाण करून डोके फोडले अशी तक्रार दिली असून या चौघां विरुद्ध गु.र.नं.230/2020 भा. दं. वि. 324, 323, 504, 506 व 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल श्रीराम चेवले हे पुढील तपास करीत आहेत.
बांध नांगरणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई होणार
या भांडणात ट्रॅक्टर क्र.एम.एच.-42/एफ-1403 शेतनांगरणी करीत असतानाचे फोटो शेतकर्‍यांनी काढला असून जिल्हाधिकारी यांनी बांध नांगरणार्‍या ट्रॅक्टरवर गुन्हा डाखल करण्याचे आदेश दिले असल्याने आता त्यावर काय कार्यवाही होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेे आहेत.

Tagged