बीड- आष्टी तालुक्यात धुमाकूळ घालणार्या बिबट्यामुळे जनता त्रस्त असतानाच आता बीडपासून बारा किमी.अंतरावरील बीड-नगर रोडवर उखंडा शिवारातील पेट्रोजपंपाजवळ एका महिलेवर अज्ञात वन्यजिवाने हल्ला केल्याचा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
उखंडा येथील स्थानिक नागरिक महादेव उबाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील पेट्रोलपंपाजवळील शेतात इंदू श्रीमंत माने (वय 35) ही महिला शेतात दारे धरत होती. त्याचवेळी बिबट्याने हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. महिलेच्या गळ्याला मफलर गुंडाळलेली असल्याने ती या हल्ल्यातून वाचली. हल्ल्यानंतर ती बेशुध्द झाल्याने तिला चर्हाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून बीडला पाठविण्यात आले आहे.
घटनास्थळी वनअधिकारी
ही घटना घडल्याची माहिती समजताच घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी मुंडे तिकडे रवाना झाले होते. घटनास्थळावर बिबट्याच्या पायाचे ठसे त्यांना दिसून आलेले नाहीत. मात्र हा हल्ला इतर कुठल्या वन्यजिवांनी केला आहे का हे तपासले जात असल्याचे मुंडे म्हणाले.
