suresh dhas

गब्बर सापडतो पण गबरू कसा सापडत नाही – आ. सुरेश धस

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : काय तुमची गेली काय सांगावं? लहान लहान लेकरं सुध्दा म्हणतात तो आवाज पुजा चव्हाणचा आहे. मी लहानपणी शोले चित्रपट बघीतला होता. त्या पिक्चरमधील गब्बर पण ठाकूरला सापडला पण या राज्यातला गबरू कोण आहे? या सरकारला गबरू कसा सापडत नाही. असा कसा गबरू आहे. तो आम्ही केवळ किल्पवरच ऐकतोय. गबरूशेठ प्रकरणाने खूप चुकीचा पायंडा पाडलेला आहे. एखाद्या समाजाचा आधार घेऊन आमच्या मागे समाज आहे म्हणून काही पण करायचं का? असा सवाल विधान परिषद सदस्य आ.सुरेश धस यांनी सभागृहात काल उपस्थित केला.

आ.धस म्हणाले, या सरकारला खरं तर नोबेल पुरस्कारच द्यायला हवाय. आम्ही पोहोरादेवी, सेवालाल महाराज, रामराव महाराजांना आम्ही पण मानतो, पण तुम्हाला विनंती करतो की असे गबरू शेठ पुढे होऊ देऊ नये. आधीच आमच्या बीड जिल्ह्याचं नाव प्रत्येक क्षेत्रात येत आहे. इंटरनॅशनल स्तरावर नाव चर्चीले जात आहे. पण तरीही (मध्येच कुणीतरी धनंजय मुंडे यांचे नाव उच्चारतो) त्याला थांबवत धस म्हणतात धनंजय मुंडेंच्या प्रकरणावर मी बोलणार नाही ते प्रकरण आम्हाला पहिल्यापासून माहितंय, असेही सुरेश धस म्हणाले.

Tagged