varsha gaikwad

दहावी-बारावीच्या परिक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार -शिक्षणमंत्री

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

मुंबई, दि. 4 : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यात अनेक शाळांमधील शिक्षक आणि विद्याथ्यार्ंंनाही कोरोनाची बाधा झाली आहे. शिवाय शाळा-महाविद्यालये उशीरा झाल्याने मुलांचा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे ह्या परिक्षाच रद्द कराव्यात अशी मागणी पालकवर्गातून पुढे आलेली होती. मात्र दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा वेळापत्रकानुसार जाहीर केलेल्या तारखेलाच ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

त्या म्हणाल्या, कोरोनाची परिस्थिती आहे त्यात मुलांची आरोग्य, सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. खूप सार्‍या तज्ज्ञांशी शिक्षण विभाग बातचित करत आह. ऑगस्टला आम्ही सिलॅबस कमी करण्याचं काम केलं. नोव्हेंबरमध्ये बोर्डाने पेपर पॅटर्न ठरतो त्याची तपासणी कशी करायचं हे ठरतं. गावखेड्यात पेपर पोहोचवायला कमीत कमी दोन महिने लागतात. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दीड ते दोन महिने लागतात. आठवी नववी परीक्षेबाबत लवकरच निर्णय घेऊ, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. बोर्डाच्या परीक्षेबाबत सूचना, मागण्या काही लोकांनी दिल्या आहेत. मात्र पेपर पॅटर्न आणि त्यानुसार मार्क्स असतात व पेपर त्यानुसार तयार केलेले असतात. त्यात काही गोष्टीची आवश्यकता असेल तर तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन घेऊन निर्णय घेऊ, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. पुढच्या वर्षाच्या अभ्यासक्रमसाठी विद्यार्थ्यांचा यावर्षीचा पाया मजबूत होणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण अजूनही सुरू राहू द्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी शाळा बंद आहेत, त्यामुळे विद्यार्थी ऑनलाईन शिकत आहेत. विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू राहावं हा आमचा प्रयत्न आहे. त्यांच्या परीक्षेसंदर्भात लवकरच सांगू, असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

Tagged