Corona

बीड जिल्हा; 716 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यात कोरोनाचा मंगळवारी (दि.6) स्फोट झाल्यासारखी परिस्थिती आहे. लॉकडाऊन काळातील सर्वाधिक रूग्णसंख्येची नोंद झाली आहे. आष्टी तालुक्यातील एकाच गावात 20 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर जिल्ह्यात 716 पॉझिटिव्ह आढळून आले.
जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, 2 हजार 237 अहवाला प्राप्त झाले असून त्यापैकी 1 हजार 521 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर तब्बल 716 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. यात अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक 161, बीड तालुक्यात 131, आष्टी 98, धारूर 29, गेवराई 43, केज 64, माजलगाव 34, परळी 88, पाटोदा 31, शिरूर कासार 31, वडवणी 6 असे रूग्ण आढळून आले आहेत..Tagged