बालकांमधील कोरोना कसा रोखावा? बाल रोग तज्ञांचा टास्क फोर्स करणार मार्गदर्शन

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बीड : पुढील सहा महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. या लाटेचा सर्वाधिक धोका बालकांना असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या आदेशानुसार बाल रोग तज्ञांचा टास्क फोर्स नियुक्त करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश शनिवारी (दि.२२) जारी केले आहेत.

टास्क फोर्सचे अध्यक्ष अंबाजोगाईच्या बालरोग विभागाचे प्रमुख डॉ.संभाजी चाटे तर सदस्य सचिव म्हणून जिल्हा रुग्णालयातील बाल रोग तज्ञ (वर्ग १) डॉ.राम देशपांडे हे असतील. तसेच आयएमएचे अध्यक्ष डॉ.अनुराग पांगरेकर हे समन्वयक असणार आहेत. सदस्यांमध्ये नेकनूरच्या कुटीर रुग्णालयाचे बाल रोग तज्ञ डॉ.सचिन आंधळकर, जिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ञ डॉ.शंकर काशीद, स्वाराती रुग्णालयातील बाल रोग तज्ञ डॉ.रमेश लोमटे यांचा समावेश असणार आहे. टास्क फोर्स बालकांमधील कोरोना कसा रोखावा? कोरोनाग्रस्त बालकांच्या उपचार, त्याच्या पद्धतीबाबत आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वानुसार मार्गदर्शन करणार आहे, असे आदेशात म्हटले आहे. सदरील आदेशाची आवाज्ञा झाल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रवींद्र जगतात यांनी आदेशात म्हटले आहे.

Tagged