मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


बीड दि.27 : अनोळखी नंबरवरुन कॉल करुन मुलीचे अश्लील फोटो व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला आणि फेसबुकला पोस्ट करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पित्याच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 49 वर्षीय इसमाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी 8623989832 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावरून फिर्यादीच्या मुलीला 8 जुलै ते 23 जुलै 2021 दरम्यान मुलीचे अश्लील फोटो पाठवून व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवले. तसेच फेसबूकवर व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं.198/2021 कलम 354 (क), 292, 506, 506 भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष साबळे हे करत आहेत.

Tagged