रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे उद्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

मनरेगाचा यंत्रणांकडून घेणार आढावा

बीड : राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे हे उद्या (दि.२८) रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते मनरेगाचा यंत्रणांकडून आढावा घेणार आहेत.

उद्या (दि.२८) सकाळी ८ वाजता औरंगाबाद येथील निवासस्थानाहून शासकीय वाहनाने गेवराईकडे प्रयाण. सकाळी ८.३० ते ११ वाजेपर्यंत गेवराई व बीड तालुक्यातील मनरेगाच्या कामांची पाहणी. सकाळी ११ ते १२ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे मनरेगा कार्यान्वयीन यंत्रणेची जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसमवेत मनरेगा आढावा बैठक. दुपारी १२ ते १ शासकीय विश्रामगृह, बीड येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक. दुपारी १ ते २ पर्यंत राखीव. दुपारी २ वाजता बीड येथून शासकीय वाहनानाने उस्मानाबादकडे प्रयाण करतील, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Tagged