माजलगाव- तालुक्यातील रोशनपुरी येथील रहीवाशी आणि आडत व्यापारी बालासाहेब माणिकराव ताकट यांचे मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते 60 वर्षांचे होते.
मागील काही दिवसांपुर्वी त्यांना न्युमोनियाची लागण झाली होती. माजलगावात तब्येत खालावत चालल्यानंतर त्यांना औरंगाबादच्या खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. परंतु दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत गेली. मंगळवारी (दि.14 डिसेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगा काशीनाथ (बाळू) ताकट, सून, पत्नी, मुली, जावाई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी (दि.15 डिसेंबर) सकाळी माजलगाव येथील मंगलनाथ स्मशानभुमीत सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी कळवले आहे. ताकट परिवाराच्या दुःखात ‘कार्यारंभ’ परिवार सहभागी आहे.