राजकीय पक्ष भांडत बसले तर कोरोनाचा विजय नक्की- अरविंद केजरीवाल

देश विदेश

दि 10: दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंंत्री अरविंद केजरीवाल यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असुन, त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपालांनी राज्य सरकारचा आदेश रद्द करुन दिलेल्या नव्या आदेशाचं पालन केलं जाईल असं आश्वासन दिलं आहे. हे मतभेद करण्याचे, तसंच राजकारण करण्याची वेळ नाही असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

अनेक पक्ष आपापसात लढताना दिसत आहेत. जर आपण असेच लढत राहिलो तर करोनाचा विजय होईल. सर्वसामान्य माणूस जो टीव्हीवर बातम्या पाहत असतो तो सर्व पक्षांना लढताना पाहून हे काय सुरु आहे म्हणत असेल ? जोपर्यंत आपण एकत्र येऊन लढणार नाही तोपर्यंत करोनाचा पराभव करणं अशक्य आहे. सर्व राज्य, संस्था, लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे, असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

दिल्ली निवडणुकीत आम्ही 62 जागा जिंकल्या आहेत. केंद्राने निर्णय घेतला आहे आणि आता त्यावर आक्षेप घेण्यात अर्थ नाही. त्यासाठी ही योग्य वेळ नाही. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं आणि नायब राज्यपालांनी दिलेल्या आदेशाचं तंतोतंत पालन केलं जाईल. यावर कोणताही वाद आणि चर्चा होणार नाही, असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

Tagged