परळी नगरपरिषदेचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

बीड

परळी : परळी नगरपालिकेच्या एकूण 17 प्रभागातून 35 नगरसेवक निवडले जाणार असून यात 6 प्रभाग अनुसचित जातीसाठी तर एक जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव झाली आहे.

नगरपालिका सभागृहात सोमवारी (दि.13) उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहिर करण्यात आली. यात एकूण 35 जागापैकी 18 जागा महिलासाठी राखीव करण्यात आल्या चिट्ठी पध्दतीने सोडण्यात आलेल्या या आरक्षणात अनुसूचित जाती महिलासाठी मिलिंद नगर प्रभाग क्र.2 अ, सिध्दार्थ नगर प्रभाग क्र.9 अ व शिवाजीनगर प्रभाग क्र.10 अ मिलिंद नगर या जागा अनुसूचित महिलासांठी राखीव झाल्या आहेत तर प्रभाग क्र.4 अ, प्रभाग क्र.8 अ,प्रभाग क्र.11 अ या अनुसूचित जाती सर्वसाधारण साठी राखीव झाल्या आहेत. उर्वरीत प्रभाग क्र. 1, 3, 5, 6, 7, 12, 14, 15, 16, 17 या प्रभागातील दोन्ही जागा या सर्वसाधारण व सर्वसाधारण महिलांसाठी सुटल्या आहेत. प्रभाग क्र.13 अची जागा अनुसूचित जमाती सर्वसाधारणसाठी तर एक ब जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाली आहे. प्रभाग क्र.10 मध्ये तीन जागा असून यात एक जागा अनुसूचित जातीसाठी राखीव सुटल्याने उर्वरीत दोन जागा सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण सुटली आहे.

प्रभागनिहाय जाहीर आरक्षण पुढीलप्रमाणे