pur

जिल्हाभरात आभाळ फाटलं!

बीड दि.28 : मागील चार दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने, त्यात सोमवारी रात्री मुसळधार पावसामुळे जिल्हाभरात आभाळ फाटल्या सारखं दिसत आहे. बीड, गेवराई, अंबाजोगाई, माजलगाव, धारुर, वडवणी, आष्टी, पाटोदा, शिरुर, केज, परळी या तालुक्यात धुवाँधार पावसामुळे शेतकर्‍यांचे आतोनात नुकसान झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. पुलावरुन पाणी वाहत असल्यास त्यावरुन जाऊ नये असे अवाहन जिल्हा […]

Continue Reading

केज डीवायएसपी म्हणून परिविक्षाधीन आयपीएस पंकज कुमावत यांची नियुक्ती

बीड दि.17 : केज उपविभागीय अधिकारी म्हणून भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी पंकज कुमावत यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या निुयक्तीचे शनिवारी (दि.19) आदेश काढण्यात आले. केज उपविभागीय पोलीस अधिकारी भास्करराव सावंत हे सेवानिवृत्त झाल्यानंतर केजची जागा रिक्त होती. आता केजला उपविभागीय अधिकारी म्हणून परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी मिळाले आहेत. शनिवारी पंकज कुमावत यांच्या नियुक्तीचे अप्पर पोलीस […]

Continue Reading

सर्पदंशाने दोन चिमुकल्या दगावल्या; आईची मृत्यूशी झुंज

केज दि.8 : दोन मुलींसह आईला सर्पदंश झाल्याची घटना मंगळवारी (दि.7) मध्यरात्री केज तालुक्यातील सानेसांगवी नं.2 येथे घडली. या घटनेत दोन्ही मुलींचा मृत्यू झाला असून आईची स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दुर्वा (4) व सुप्रिया दीपक साखरे (3) असे मृत चिमुकल्यांची नावे आहेत. तर […]

Continue Reading
r raja

एसपींच्या विशेष पथकाने 17 लाखांचा गुटखा पकडला

बीड दि.3 : पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने केज तालुक्यात धाड टाकत 17 लाख 46 हजारांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.2) रात्री करण्यात आली. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पप्पू कदम (रा.क्रांतीनगर ता.केज) असे आरोपीचे नाव आहे. त्याने येथीलच वसंत महाविद्यालयाच्या उत्तरेस शेवाळे यांच्या घराच्या बाजूच्या गोडाऊनमध्ये […]

Continue Reading
aaropi

अंबाजोगाई ठाण्यातून पळालेल्या ‘त्या’ दरोडेखोरास केज पोलिसांनी पकडले!

बीड दि.2 : अंबाजोगाई येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला तब्बल सहा वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने गजाआड केले होते. त्यानंतर या आरोपीस अंबाजागाई शहर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र अंबाजोगाई शहर पोलीसांच्या निष्काळजीपणामुळे सदरील आरोपीने ठाण्यातून पलायन केले आहे. त्यानंतर काही तासातच केज पोलिसांनी या आरोपीस जेरबंद केले आहे. हा आरोपी पुण्याला जाण्याच्या तयारीत होता. […]

Continue Reading
accident

वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

रुग्णवाहिकेच्या धडकेत एकाचा तर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यूबीड दि.2 : रुग्णवाहिकेच्या व अज्ञात वाहनाच्या धडकेत वेगवेगळ्या अपघातात बुधवारी (दि.1) रात्रीच्या सुमारास दोघा तरुणांचा मृत्यू झाला. अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा येथील तरुणाला अज्ञात वाहनाने उडवले. या अपघातात त्या तरुणाचा मृत्यू झाला. तर, गुरुवारी सकाळी केज तालुक्यातील होळ येथे रुग्णवाहिकेने दिलेल्या धडकेत धारूर तालुक्यातील तरुण ठार झाला. […]

Continue Reading
mobile chor, mobile chori

गावाकडे सुट्टीवर आलेल्या एसआरपीच्या जवानाला लुटले!

केज दि.10 : पुणे जिल्ह्यातील राज्य राखीव दलात कार्यरत असलेले जवान हे गावाकडे सुट्टीवर आलेले असताना ते व त्यांची पत्नी हे दोघे स्कुटी वरून जात असताना त्यांना केज – बीड रोडवरील सावंतवाडी पाटी टोल नाक्याजवळ तीन चोरट्यांनी दुचाकी आडवी लावून मारहाण केली. तसेच गळ्यातील सोने, मोबाईल व रोख रक्कम पळविली असल्याची घटना घडली आहे. केज […]

Continue Reading

शेततळ्यात बुडून सख्या भावंडांचा मृत्यू

केज तालुक्यातील लाडेवडगाव येथील घटनाआडस दि.27 : आई-वडील सोबत शेतात गेलेल्या सख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.27) दुपारी 1 च्या सुमारास केज तालुक्यातील लाडेवडगाव येथे घडली. हर्षल माधव लाड (वय 8), ओम माधव लाड (वय 4) अशी मयत चिमुकल्यांची नावे आहेत. ते दोघेही आई-वडीलां सोबत स्वतःच्या शेतात गेले होते. तीन […]

Continue Reading
atyachar

अत्याचारासह विनयभंगाच्या घटनांनी केज तालुका हादरला

केज दि.23 : आज महिलांसह मुली सुरक्षीत नसल्याचे वारंवार घडणार्‍या घटनावरून दिसून येते. केज तालुक्यात एकाच दिवशी विविध ठिकाणी घडलेल्या अत्याचार, विनयभंगाच्या घटनांनी हादरला आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस तपास करत आहेत. अशा नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. चुलत दिराने केलाभावजयीचा विनयभंगकेज : तीस वर्षीय […]

Continue Reading

प्रियेसी पाठोपाठ प्रियकराचीही त्याच स्कार्फने गळफास घेवून आत्महत्या!

केज दि.21 : तीन महिन्यांपूर्वी कोल्हापूर येथून उत्रेश्वर पिंपरी येथे आलेल्या प्रेमी युगुलांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.21) सकाळी उघडकीस आली. मंगळवारी प्रथम प्रेयसीने व त्यांनतर प्रियकराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्याचे कारण अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत. आकाश शिवाजी धेंडे (वय 25) व सावित्री (वय 28) अशी मृतांची नावे आहेत. […]

Continue Reading