केज डीवायएसपी म्हणून परिविक्षाधीन आयपीएस पंकज कुमावत यांची नियुक्ती

केज क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.17 : केज उपविभागीय अधिकारी म्हणून भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी पंकज कुमावत यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या निुयक्तीचे शनिवारी (दि.19) आदेश काढण्यात आले.
केज उपविभागीय पोलीस अधिकारी भास्करराव सावंत हे सेवानिवृत्त झाल्यानंतर केजची जागा रिक्त होती. आता केजला उपविभागीय अधिकारी म्हणून परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी मिळाले आहेत. शनिवारी पंकज कुमावत यांच्या नियुक्तीचे अप्पर पोलीस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल यांनी आदेश काढले.

Tagged