narega

माजलगावचे बीडीओ सक्तीच्या रजेवर; बदलीचाही ठराव मंजुर

न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव

माजलगाव : तालुक्यात रोजगार हमी योजनेची MREGS कामे सुरु नाहीत. पदाधिकार्‍यांनी वारंवार सूचना करुनही गटविकास अधिकार्‍यांनी कसलीही कार्यवाही केली नाही. हा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेत आला. त्यांना माजलगावचे गटविकास अधिकारी BDOबी.टी.चव्हाण यांना सक्तीच्या रजेवर पाठवून बदलीचाही ठराव मंजुर झाला आहे.

येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी.टी.चव्हाण हे रोजगार हमी योजनेंतर्गत कामांकडे दुर्लक्ष करतात. त्यांना वारंवार सूचना करुनही ते कामे करत नाहीत. परिणामी, माजलगाव तालुक्यात शेत रस्ते, विहीर व इतर कामे होत नसल्याने विकास कामास गती मिळालेली नाही. त्यामुळे त्यांच्या बदलीचा ठराव जि.प.सदस्य चंद्रकांत शेजुळ यांनी मांडला. हा ठराव सर्वानुमते मंजुर झाला असून त्यांना तातडीने गटविकास अधिकार्‍यांना सक्तीच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष शिवकन्या सिरसट, उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी दिले आहेत. दरम्यान, रोजगार हमी योजनेच्या कामांकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

Tagged