पाय घसरुन खदाणीत पडल्याने तरुणाचा मृत्यू

केज क्राईम न्यूज ऑफ द डे

केज : चुलत्याला भेटण्यासाठी जात असलेल्या तरुणाचा केज येथील बीड रोडवरील एका खदाणीत पाय घसरुन पडल्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.27) सकाळी घडली. 

     चंद्रकांत हनुमंत इटकर (वय 19 रा.अंबाजोगाई) असे मयताचे नाव आहे. हा केज येथील बीडरोड लगत वडार वस्तीवर राहणार्‍या आपल्या चुलत्याकडे भेटण्यासाठी आला होता. सकाळी तो वडारवस्तीच्या पाठिमागील बाजुस आसलेल्या पाण्याने भरलेल्या खदानीत पाय घसरुन पडल्याने त्याचा मृत्यू झाला. मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. खदाणीत तो पाय घसरुन पडला की आणखी काही वेगळा प्रकार आहे. याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती केज पोलीस ठाण्याचे पोनि.प्रदिप त्रिभुवन यांनी दिली.

Tagged