atyachar

खळबळजनक! नगसेविकेच्या पती विरोधात अत्याचाराचा गुन्हा

केज क्राईम न्यूज ऑफ द डे


नगसेविकेकडून फिर्यादी महिलेविरोधात ब्लॅकमेलींगची तक्रार
केदि.28 ः येथील नगरसेविकेच्या पती विरोधात तालुक्यातील एका महिलेने अत्याचाराची तक्रार दिली. त्यावरून केज पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. तर नगरसेविकेने तक्रारदार महिलेच्या विरोधात ब्लॅकमेलींगची तक्रार केली आहे. यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील एका महिलेने सुग्रीव कराड याने माझ्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवून अनेक वेळा इच्छे विरुद्ध शारिरीक संबंध ठेवले आहे. तसेच एकदा दोन महिन्याचा गर्भपात केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर मी लग्नाचा तगादा लावल्याने तु खालच्या जातीची आहेस म्हणून लग्नाला नकार दिला. तसेच सोमवारी (दि.27) सुग्रीव कराड याची पत्नी, आई व इतर दोन महिला यांनी माझ्या घरी येऊन मला मारहाण केली. सोडविण्यासाठी आलेल्या माझ्या आई, वडीलांना मारहाण केली. जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देत तु गावात कशी राहतेस हे बघून घेतो असेही पोलीसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यावरून सुग्रीव कराड, पत्नी, आई व इतर दोन महिलांच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


.
फिर्यादी महिलेविरोधात
ब्लॅकमेलींगची तक्रार

केज नगर पंचायतीच्या नगरसेविका आशा सुग्रीव कराड यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गावातील त्या महिलेने मी एकटी रहाते म्हणून मदत करण्याची मागणी केली होती. त्यावरून सदरील महिलेला अनेक वेळा रोख रक्कम देऊन मदत केली. आतापर्यंत जवळपास 2 लाख 50 हजार रुपये दिले आहेत. तरीही ती 12 लाख रुपये मागत असून जर पैसे नाही दिले तर मी तुझ्या पती विरोधात बलात्काराची तक्रार देऊन बदनामी करेल अशी धमकी देत असल्याचे म्हटले आहे. यावरून बलात्काराची तक्रार दिलेल्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांनाही एकमेकांच्या विरोधात तक्रार दिल्याने नेमका हा घोळ काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. पोलीस याचा तपास करत असून, या तपासातून खरे कारण समोर येईल.

Tagged