नाथसागराच्या पाण्यात मंजरथकरांचे रस्त्यासाठी जलसमाधी आंदोलन सुरु

न्यूज ऑफ द डे माजलगावमंजरथ दि.29. तालुक्यापासुन अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेले मंजरथ हे ऐतिहासिक धार्मिक स्थळ असून धार्मिक विधिसाठी प्रसिध्द आहे. परंतु येथे जाण्यासाठी नागरिक चांगलेच वैतागले आहेत. रस्त्यात खड्डा कि खड्ड्यात रस्ता कळायला मार्ग नसून स्थानिक ग्रामस्थांसह येथे येणार्‍या प्रत्येक नागरिकांना आपला जिव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता अंत्यत खराब असून दिवसभरात हजारो लोकांची या रस्त्यावरून ये-जा असते परंतु प्रशासनाच्या उदासिनता मुळे मंजरथ-माजलगाव रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे.

मुख्य रस्त्यावर खड्डेच खडे पडल्याने वाहनधारकांना व शालेय विद्यार्थ्यांना याचा नाहक ञास सहन करावा लागत आहे. या खराबमुळे रस्त्यामुळे येथील बस सेवाही बंद झालेली असून विद्यार्थासंह नागरिकांना याचा आर्थिक फटका सहन करावा लागत असून, खाजगी वाहनाने शहराकडे जातांना मोठी कसरत करावी लागत आहे. हि समस्या गंभीर असली तरी याकडे माञ बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याने गावकर्‍यांनी आता थेट जलसमाधी अांदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता तरी बांधकाम विभाग कार्यवाही करेल का..? याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. दिवसभरात हजारो लोकांची ये-जा असते. परंतु प्रशासनाच्या उदासिनता मुळे मंजरथ ते माजलगाव रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्यावर खड्डेच खडे पडल्याने वाहनधारकांना व शालेय विद्यार्थ्यांना याचा नाहक ञास सहन करावा लागत आहे. दरम्यान मिळालेली आधिक माहिती अशी माजलगाव तालुक्यापासुन 11 किमी अंतरावर मंजरथ हे गाव आहे. गोदावरी नदीच्या तिरावर बसलेल्या या गावाची लोकसंख्या 4 हजार आहे. ऐतिहासिक वास्तूमुळे गावाला तिर्थ क्षेत्र विकासाचा दर्जा प्राप्त असून, दक्षिन प्रयाग लक्ष्मी ञिविक्रराम यांचे लहान मंदिरे तिरावरती आहेत. धार्मिक विधिसाठी लोक पर जिल्हातून येथे येतात. आपला जीव मुठित धरून नागरिकांना येथून प्रवास करावा लागत असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाच्या विरोधात गोदावरी नदी पात्रात नाथासागरच्या 19 हजार क्युसेेस वेगाने सोडलेल्या पाण्यावर गावकरी जिवघेणे जल समाधी आंदोलन करीत आहेत. आता याकडे स्थानिक आमदारांसह प्रशासन काय निर्णय घेईल याकडे जिल्हा वासियांचे लक्ष वेधले आहे. या आंंदोलना मध्येे भिमराव कदम, अशोक शिंदे, बाळु बारहात्ते, संतोष वाघमारे, सुभाष थोरात ,विनोद वाघमारे, आकाश अस्वले, भारत आस्वले, या सोबत गावकरी ठान मांडून आहेत. आंदोलन स्थळी पोलीसांचा तगडा बंदोबस्त आहे. पंचायत समितीच्या अधिकार्‍यांची गावकर्‍यांन सोबत त्यांची चर्चा सुरू असून कुठल्याही लेखी अश्वासनाला किंवा निवेदनाला बळी पडणार नसल्याचे आंदोलन कर्त्यांचे स्पष्ट मत आहे.

Tagged