मुंबई, दि. 9 : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आता काहीच मिनिटांमध्ये होत आहे. दोन्ही गटाचे एकूण 18 आमदार यावेळी मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या विस्तारात भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार, रविंद्र चव्हाण, अतुल सावे, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, सुरेश खाडे, चंद्रकांत पाटील, राधकृष्ण विखे पाटील, मंगलप्रभात लोढा, यांची नावे फायनल झाली आहेत. तर शिंदे गटाकडून संदीपान भुमरे, दादा भुसे, तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, संजय राठोड, उदय सामंत यांची नावे फायनल झालेली आहेत. या सर्व संभाव्य मंत्र्यांच्या नावाच्या खुर्च्या राजभवनात शपथेच्या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत. संभाव्य सर्व मंत्री राजभवनात पोहोचलेले आहेत.