दुचाकीला वाचवताना वर्‍हाडाचा टेम्पो पलटला

क्राईम माजलगाव


पंधरा वर्‍हाडी जखमी; माजलगाव-तेलगाव रोडवरील घटना
माजलगाव
दि.1 ः बीड जिल्ह्यात लग्नसमारंभासाठी जालना जिल्ह्यातील वर्‍हाड आले होते. लग्नसमारंभ आटोपल्यानंतर जालन्याकडे परतत असताना हा वर्‍हाडाचा टेम्पो माजलगाव-तेलगाव रोडवरील लहामेवाडी पाटीजवळ गुरुवारी (दि.1) सायंकाळच्या सुमारास पलटी झाला. यामध्ये पंधरा ते वीस वर्‍हाडी जखमी झाले असून यामध्ये पाच ते सहा बालकांचाही समावेश आहे. जखमींना तातडीने माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.

जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील पारडगाव येथून बीड येथे लग्नसमारंभासाठी आयशर टेम्पो आला होता. लग्न आटोपून तेलगाव मार्गे माजलगावकडे येत असताना लहामेवाडीपाटी जवळ समोरून आलेल्या दुचाकीला वाचवताना चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर टेम्पो पलटी झाला. यावेळी नागरिकांनी तात्काळ मदतकार्य केले. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला तर टेम्पो ताजींना वसीम कुरेशी, जैबून लियाकत कुरेशी, लतीफाबी मदन कुरेशी, वसंत सटवाजी पाडुळे, शफी अहमद हसन हे जखमी झाले. त्यांच्यावर माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर बीड जिल्हा रुग्णालयात चौघांवर उपचार तर काही जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Tagged