ACB TRAP

युसूफवडगाव ठाण्यात ट्रॅप; लाचखोर हवलदारासह अन्य एकास पकडले

केज क्राईम न्यूज ऑफ द डे

जामीन मांडण्यासाठी मागितले होते १८ हजार

केज : तालुक्यातील युसूफवडगाव पोलीस ठाण्यातील लाचखोरी अखेर चव्हाट्यावर आली आहे. ठाण्यातील पोलीस हवालदारासह अन्य एका व्यक्तीस लाच घेताना बुधवारी (दि.९) एसीबीने रंगेहाथ पकडले आहे.

  लक्ष्मीकांत काशीराम पवार (वय ५२) असे पोलीस हवालदार व शेषेराव वैरागे (वय ५८, सेवानिवृत्त होमगार्ड) असे एसीबीने कारवाई केलेल्यांची नाव आहे. तक्रारदाराकडून जामीन मांडण्यासाठी १८ हजारांची लाच मागितली होती. तडजोडीपोटी ९ हजार रुपये घेताना युसूफवडगाव ठाण्याच्या आवारात रंगेहाथ पकडले. ही कारवाई एसीबीच्या बीडच्या पथकाने उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. दरम्यान, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Tagged