अतिक्रमण हटवण्यास सां.बा. विभागाने दिली महिन्याची मुदत

बीड

सिरसाळ्यातील व्यवसायिकांना दिलासा; रस्ता चौपदरीकरणास सुरुवात होणार

सिरसाळा : परळी तालुक्यातील सिरसाळा येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते बीएसएनएल टाॅवरपर्यंतचे रस्ता चौपदरीकरणाच्या कामासाठी रस्ता हद्दीतील ५० फुटांपर्यंतची व्यवसायिक अतिक्रमणे तीन दिवसात हटवली जाणार होती.

विभागाकडून अतिक्रमणधारकांना सहाय्यक अभियंता गित्ते यांनी शुक्रवारी (दि.२०) प्रत्यक्ष भेट देऊन नोटीस बजावल्या होत्या. यामुळे व्यवसायिकात खळबळ उडाली होती. नोटीसनुसार मुदत कमी होती. व्यवसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध व्हावी यासाठी तीन दिवसाऐवजी एक महिन्याचा कालावधी करण्यात आला असल्याची माहिती सहायक अभियंता श्रीमती गित्ते यांनी पत्रकारांना बोलताना दिली. दरम्यान, व्यवसायिकांची तारांबळ होऊ नये, पर्यायी जागा व्यवसायिकांनी शोधावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ प्रशासने हा निर्णय घेतला आहे. रस्ता चौपदरीकरण काम (१५ मिटर) रविवारपासून सुरू होणार आहे. एक महिन्यानंतर अतिक्रमण मात्र हटवले जाणार आहे, असेही गित्ते यांनी म्हटले आहे.