कापसाला भाव नसल्यामुळे शेतकर्‍याने उचललं टोकाचं पाऊल!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड वडवणी


वडवणी दि.27 : यावर्षी कापसाला चांगला भाव (cotton price) मिळेल, या आशेवर बसलेल्या शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच पडली आहे. सध्या शेतकर्‍यांच्या कोणत्याच पिकाला भाव नाही. त्यात कापूसाला भाव नसल्यामुळे वडवणी तालुक्यातील मोरेवाडी येथील शेतकर्‍याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शनिवार, 27 मे रोजी घडली. (Farmer takes extreme step due to lack of price for cotton!)

वचिष्ठ आश्रुबा मुंडे (वय 35) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. कापसातून मोठे उत्पन्न मिळेल अशी त्यांना आशा होती. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्ज घेतलेले होते. परंतू कापसाचा भाव वाढत नसल्यामुळे आलेल्या नैराश्यातून स्वतःच्या शेतातील आंब्याच्या झाडाला (mango tree) गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात वयोवृद्ध आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Tagged