chori, gharfodi

नेकनूरमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट

बीड

NEKNOOR NEWS दि.27 : घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने एका शिपायाच्या घराचे कुलूप तोडून आतील दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना रात्री शिक्षक कॉलनीमध्ये घडली. दुसरी चोरीची घटना याच भागात घडली असून शिक्षकाच्या घरातून दुचाकी, लॅपटॉप चोरी केला आहे. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (NEKNOOR After breaking the lock of the house, gold ornaments worth two lakhs of rupees were looted from inside)

किसन नारायण कानडे (रा. शिक्षक कॉलनी, नेकनूर) हे आपल्या कुटुंबियांसमवेत गावी गेले होते. याच संधीचा फायदा उचलून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आतील दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. शनिवारी सकाळी सदरील हा प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी सहायक निरीक्षक मुस्तफा शेख, उपनिरीक्षक पानपाटील, प्रशांत क्षीरसागर, दीपक खांडेकर, अनवणे हे दाखल झाले होते. चोरीच्या तपासासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. दुसरी चोरीची घटना याच भागात घडली. शिक्षक सदाशिव रोकडे यांची होंडा शाईन कंपनीची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली आहे.

Assistant Inspector Mustafa Shaikh, Sub Inspector Panpatil, Prashant Kshirsagar, Deepak Khandekar, Anwane

Tagged