कृषीमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या विकास कामांची आढावा बैठक

बीड

बीड : राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा शनिवारी बीड जिल्ह्यात दौऱ्या असून या दरम्यान ते जिल्ह्यातील विकास कामांची आढावा बैठक घेणार आहेत.

नुकतीच पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली. बीड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा पदभार राज्याचे कृषीमंत्री श्री मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आला.पालकमंत्री म्हणून उद्या (शनिवारी) जिल्ह्याच्या विविध विभागांच्या विकास कामांची आढावा बैठक दुपारी 3 वाजता, जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित केली आहे.या बैठकीस जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकारी त्यांच्या विभागाच्या अद्यावत माहितीसह उपस्थित राहणार आहेत.