सिक्कीम येथे झालेल्या ढगफुटीत बीडचे जवान पांडुरंग वामन तावरे हुतात्मा

बीड

सिक्कीम येथील ढगफुटीत बीड जिल्ह्याचे भूमीपुत्र जवान पांडुरंग वामन तावरे हे 3 दिवसांपासून बेपत्ता झाले होते. पुराच्या पाण्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचे पार्थिव उद्या सकाळी त्यांचे मूळ गाव पाटोदा तालुक्यातील काकडहिरा या गावी आणणार आहेत व त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सिक्कीममध्ये मंगळवारी पहाटे 1.30 ते 2.00 वाजण्याच्या सुमारास ढगफुटी झाली. त्यामुळे तिस्ता नदीला मोठा पूर आला होता. नदीच्या पाण्याची पातळी 15 ते 20 फुटांनी वाढली. यानंतर नदीलगतचा भाग पाण्याखाली आला. नदीलगतच्या परिसरात लष्कराची छावणी होती. ती पुरामध्ये वाहून गेली आणि तेथे उभी असलेली सैन्य दलाची वाहने बुडाली. या जवानांमध्ये बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील जवान पांडुरंग वामन तावरे (वय 36) हे बेपत्ता झाले होते आज त्यांचा मृतदेह आढळून आला.