MANOJ JARANGE AND NARAYAN RANE

निलेश राणे यांनी आपल्या वडीलांना समजावून सांगावं -मनोज जरांगे

बीड

आंतरवाली सराटी, दि.16 ः निलेश राणे यांना विनंती आहे की तुम्ही त्यांना (नारायण राणे) थांबवा. नारायण राणे यांना नारायण राणे साहेब असेच आम्ही म्हणतो. नरेंद्र मोदी साहेबांना सुध्दा ओबीसीचा स्वाभीमान आहे. राणे साहेबांबद्दल आम्ही कधी शब्द काढला का? तुम्हाला तर मराठ्यांचा स्वाभीमान पाहीजे. आता माझी शेवटची विनंती आहे की निलेश राणे साहेब त्यांना थांबवा. नाहीतर मी कोण आहे आणि ते कोण आहेत काय आहेत हे मी बघणारच नाही. ही आता नारायण राणे यांना शेवटची संधी. ते आता उद्या जरी काही बोलले किंवा ते थोड्यावेळात जरी बोलले तरी त्यांना आता सुट्टीच नाही. ते जर मला चॅलेंज देत असतील तर मग मी पण मराठा आहे. मी तिसर्‍याला बोलताना तुमचं मधेमध्ये बोलायचं काय काम? असा सवाल मनोज जरांगे MANOJ JARANGE यांनी केला आहे.

तुम्ही चारच दिवस उपोषण करून दाखवा
गप अंथरूणात पडून राहा, उपोषणाची नाटकं करतो, असे म्हणत नारायण राणे यांनी मनोज जरांगे यांच्यावर टिका केली होती. त्यावर बोलताना जरांगे म्हणाले, तुम्ही चारच दिवस उपोषण करून दाखवा, मग कुणीकडून कुणीकडून तुमच्या हवा निघेल ना मग तुम्हाला कळेल की उपोषण काय असते? आपल्या शिव्यांबद्दल बोलताना ते म्हणाले, लक्षात घ्या रक्त बिक्त कमी पडल्यावर माणूस बोलत राहातं. चिडचीड होते, तोंडात शिव्या वैगेरे येतात. पण पोरांसारखं समजून त्याकडे दुर्लक्ष करा, असे अवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले.

तू ओबीसी आहे का? भुजबळांना सवाल
तू आपला फुकटात ओबीसीत जावून बसलास. आम्हाला काय विचारतो ओबीसी म्हणून, तू ओबीसीमध्ये आहेस का? त्याला एखादं घरकूल बिरकूल असेल तर देवून टाका बरं, असे म्हणत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांची खिल्ली उडवली. खोट्या नोंदी घेऊन कुणबी प्रमाणपत्रे वाटप होत असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला होता.