MODI

भारत आपल्या प्रत्येक इंच जमिनीचं संरक्षण करेल : पंतप्रधान मोदी

देश विदेश

चीनच्या कुरापती सीमेवर सुरूच आहेत. अशातच आपले २० जवान या चकमकीत शहिद झाले आहेत. सर्व देशाचं लक्ष पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे होतं. याविषयी पंतप्रधान मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. जवानांच्या कुटुंबीयांविषयी देखील त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि चीनला देखील भारत काय करू शकतो ते या प्रतिक्रियेत सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दांत चीनला इशारा दिला आहे. भारत कधीही अखंडतेशी तडजोड करणार नाही. जर आम्हाला कुणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य ते उत्तर देऊ, अशा स्पष्ट शब्दात मोदींनी चीनला सुनावले आहे. कोरोना संकटाच्या मुद्द्यावर आयोजित करण्यात मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदाच लद्दाखमधील भारत-चीन सीमावादाबाबत चर्चा केली.

काय म्हणाले पंतप्रधान?

“गलवान खोऱ्यात सीमेवर शहीद झालेल्या जवानांनाप्रती मी सहवेदना व्यक्त करतो असे म्हणत देश आपल्या सोबत आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद जवानांच्या कुटुबीयांना दिला. कोणत्याही प्रकारची स्थिती असली तरी देखील देश तुमच्या सोबत आहे, असेही मोदी म्हणाले. भारत आपला स्वाभिमान आणि एका एका इंच जमीनीचे संरक्षण करेल असेही ते म्हणाले. भारत कधीही अखंडतेशी तडजोड करणार नाही. जर आम्हाला कुणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य ते उत्तर देऊ,” अशा स्पष्ट शब्दात मोदींनी चीनला सुनावले आहे.

Tagged