ravindra singal

आयजी रविंद्र सिंगल यांनी पुर्ण केली 90 किमीची रेस

खेळ बीड मराठवाडा

व्यायाम करुन सर्वांनी सुदृढ राहण्याचा दिला संदेश
 बीड : डॉ.रविंदर कुमार सिंगल (आयर्न मॅन) यांनी मागील काही महिन्यांपासून आपल्या राहत्या ठिकाणी खूप कष्टाचा सराव करून रविवारी (दि.14 जून) तब्बल 90 किलोमीटर अंतर असलेली कॉम्रेड लिजेंड वर्चुअल रेस तेरा तासामध्ये पूर्ण केली. ज्यामध्ये त्यांनी सोशल डीस्टनसिंगचे नियम पाळून, शहरवासीयांना एक छान आसा आरोग्य ठणठणीत कसे ठेवायचे याचा कृतिमधून संदेश दिला आहे. मोठे ध्येय समोर ठेवून जर त्याचा अभ्यास सातत्याने केला तर निश्चितच यश समोरून चालून येऊन आदर भावाने आपल्या पदरी पडते. चांगली कृती करत राहणे त्यातून निर्माण होणारे सकारात्मक बदल आपल्यात आपोआप होतात तर सभोवतालचे वातावरण सुधारण्यास कारणीभूत सुद्धा ठरते व त्यातून मिळणारा आनंद हा अवर्णनीय आहे. या शिवाय डॉ.रविंद्र सिंगल यांनी मागील लॉकडाऊनचे काळात विविध उपक्रमांद्वारे जनजागृती केली. ज्यामधून सर्व वयोगटातील लोकांना आरोग्यविषयक तसेच सामाजिक बांधिलकी विषयक जनाजगृती केली. यामध्ये लॉकडाऊनचे सगळे नियम पाळून आयर्न मॅन क्लब तर्फे आयोजित केलेले वर्चुअल चॅलेंज पूर्ण केले. औरंगाबाद ते पाचोड व पाचोड ते औरंगाबाद अशी 90 किमी रेस त्यांनी अवघ्या तेरा तासामध्ये यशस्वीरित्या पूर्ण केली.

     दुसरे म्हणजे त्यांनी युगांडा वर्चुअल ऑलंपिक चॅलेंज मध्ये सुद्धा सहभाग नोंदविला ज्यामध्ये त्यांनी सलग सहा तासाचे रनिंग सायकलिंग दोन्ही अ‍ॅक्टिविटी करून एकूण भारतीय सहभागी खेळाडूंमध्ये रनर अप म्हणून स्वतःचे स्थान निश्चित केले. ज्यामध्ये त्यांनी तीन पदके मिळविली. आरोग्यविषयक लोकसहभाग करून घेण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांनी एक फेसबुकचे मध्यामातून फिटनेसचे राजदूत (रालरीीरवेी ेष ऋळींपशीी ) नावाचा एक समूह सुरू केलेय ज्यामध्ये आठशे पेक्षा जास्त सर्व वयोगटातील खेळाडू सहभगी करून घेतले, त्यातील सर्व सभासद दररोज आपापल्या घरी व्यायाम करून स्वतःला सुदृढ ठेवत आहेत. या समूहाच्या माध्यमातून मागील रविवारी एक धावण्याची स्पर्धा सुद्धा आयोजित केली होती. ज्यामध्ये तीनशे स्पर्धकांनी सहभाग नोंदविला त्यांना प्रमाणपत्र ईमेलचे माध्यमातून देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक बांधिलकी मधील एक छान उपक्रम म्हणजे डॉ.सिंगल यांनी लॉकडाऊन दरम्यान मुक्या जनावरांना पिण्यासाठी पाणी व अन्न देण्याचे उपक्रम सुद्धा राबविले आहेत. यामध्ये शहरांमधील अनेक तरुणांना त्यांनी प्रोत्साहित करून मुक्या प्राण्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावली, काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वतः त्यामधील एक साधे श्वान दत्तक घेऊन समाजाला एक प्रेमळ संदेश दिला आहे. एकूणच आपण सर्वांनी व्यायाम करून सुदृढ राहणे व सामाजिक बांधिलकी जपणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे हा संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न आपल्या कृतीमधून केला आहे. औरंगाबाद ते पाचोड रनिंग दरम्यान त्यांच्यासोबत अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे आयर्न मॅन नितीन घोरपडे, डॉ.मुस्ताफा, साहेर, अर्जून राजपूत, विशाल कुलकर्णी, सागर टेरके, शिवम वडनेरे यांचाही सहभाग घेतला होता.

Tagged