बीड दि.5 : अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणारी कार बीड ग्रामीण पोलीसांनी शनिवारी (दि.5) सकाळी बीड बायपासवरील महालक्ष्मी चौकात पकडली. यावेळी कार व दारु असा 3 लाख 69 हजाराचा मुद्देमाल जप्त करत दोघांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाऊसाहेब आश्रुबा जाधव (वय 35 व्यवसाय चालक रा.नाळवंडी ता.बीड) व मालक बळीराम गायके (रा.नाळवंडी) यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड बायपासवरील महालक्ष्मी चौकात देशी दारु घेऊन जाणारी स्विफ्ट (एमएच 47 एन 5627) कार उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कार्यारंभ पोलिसांनी छापा टाकत 69 हजार 300 रुपयांच्या देशी दारूचे 20 बॉक्स व स्विफ्ट कार असा 3 लाख 69 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक व देशी दारू मालक दोघांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, बीड ग्रामीणचे निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन काकरवाल, पोना.नामदेव सानप, पोना. मोहसीन शेख यांनी केली.