माजलगावचे अपक्ष उमेदवार माधव निर्मळ madhav nirmal यांचा आ. प्रकाश सोळंकेंवर हल्लाबोल
माजलगाव, दि.5 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी वडीलांपासून काम करतो म्हणून मी पक्षाकडे माजलगाव विधानसभेचे उमेदवारी मागितली होत. मात्र पक्षाने त्यांच्याच नात्यागोत्यातील लोकांना उमेदवारी दिली यामुळे मी अपक्ष उमेदवारी दाखल केली. मात्र या ठिकाणचे विद्यमान आमदारांनी यांनी मला उमेदवारी माघार घेण्यासाठी माझ्या सहकार्याला व मला बघून घेऊ जेलमध्ये टाकू, अशा धमक्या दिल्या. त्यामुळे मी नॉटरिचेबल होतो. अशा धमक्यांना घाबरणारा मी नसल्याचा हल्लाबोल अपक्ष उमेदवार महादेव निर्मळ यांनी केला. माजलगाव शहरातील वैष्णवी मंगल कार्यालयात त्यांनी मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी माधव निर्मळ बोलत होते.
यावेळी कल्याण आबुज, पी.टी.चव्हाण, बाळासाहेब गायकवाड, बबनराव सरवदे, सतीश बडे, सुग्रीव मुंडे यांचे प्रमुख उपस्थिती होती. निर्मळ म्हणाले की, झालेली लोकसभेची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर न होता जातीपातीवर झाली. यामुळे अल्पशः मताने पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाला. यावेळी अनेकांनी गाड्या अडवल्या. या गाड्या अडवण्याचा बदला घेण्यासाठी माझी उमेदवारी आहे. माझी उमेदवारी असल्याने विद्यमान आमदारांनी यंत्रणा लावून 18 मोबाईलचे लोकेशन तपासले. माझ्या सहकार्यांना दबाव टाकून तुमच्याकडे बघून घेतो, जेलमध्ये टाकतो, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या. या धमक्याला घाबरणारा मी नसून आमदारांनी सर्वांची लूट केली. यांनी माझ्या बॅनरवर असलेला छगन भुजबळ यांचा फोटो वरिष्ठांना सांगून काढायला लावला. फोटो काढला तरी छगन भुजबळ हे माझ्या हृदयात आहेत, असाही हल्लाबोल निर्मळ यांनी केला. निर्मळ एवढ्यावरच थांबले नाहीत. ते म्हणाले विद्यमान आमदार हे आडवा आडवी करणारा माणूस आहे. प्रत्येकाला म्हणतो मी बघून घेतो. परंतु मी आडत बी नाही आणि जिरत बी नाही, असा माणूस आहे. भर सभेत धनंजय मुंडे यांना एकेरी भाषेत बोलणारा, डॉ. आनंदगावकर यांना शिवीगाळ करणारा त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडणारा, मराठा समाजावर गुन्हे दाखल करून भर दिपवाळी मध्ये तरुणांना वन वन भटकायला लावणार्या अशा लोकांमुळे मला मला नॉटरीचेबल व्हावे लागले. यामुळे मला दिवाळीमध्ये माझ्या मतदारांना भेटता आले नाही की त्यांना पाडव्याच्या शुभेच्छा देता आल्या नाहीत. विद्यमान आमदारांच्या स्वतःच्या गावामध्ये पंकजाताई मुंडे या तीन नंबर वर आहेत. एक वेळेस मला संधी द्या मी या सर्वांना सुता सारखे सरळ करतो. माजलगाव मतदार संघात दहा हजार उद्योजक बनवण्याचा माझा मानस आहे. माजलगाव विधानसभा मतदार संघ महाराष्ट्रात एक नंबरचा करतो, असेही आवाहन अपक्ष उमेदवार माधव निर्मळ यांनी केले यावेळी मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.