track accident

सौताडा घाटात साखर घेवून जाणार ट्रक पलटी, चालक ठार

क्राईम

प्रतिनिधी। बीड दि.21: पाटोदा जामखेड पासून सात किलोमीटर अंतरावर सौताडा घाटामध्ये साखरेने भरलेला एक ट्रक पलटी झाला होता. यामध्ये चालक लायक शब्बीर पठाण (वय 42) हे जागीच ठार झाले. तर अशोक तोरडमल ( वय 24 रा.ममदापूर (पाटोदा )ता.अंबाजोगाई) हे गंभीर जखमी झाले. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. रेनापूर शुगर कारखाना, अंबाजोगाई येथून साखर घेवून जाणारा ट्रक (एम.एच-44, 8955) सौताडा घाटात दहा फूट खोल दरीत कोसळला. यावेळी किन्नर बाजूला पडल्याने जखमी झाला तर चालकाचा जागीच मृत्यू झाला. यावेळी घटनेची माहिती मिळताच समाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, सुनिल कोठारी यांनी आपल्या रुग्णवाहिकेतून जखमीला रुग्णालयात दाखल केले. यावेळी घटनास्थळी जामखेड पोलीस ठाण्याचे पोनि.प्रभाकर पाटील, तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी भेट दिली.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.