ashit khun

बापच निघाला मुलाचा खूनी

आष्टी क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

अंभोरा पोलीसांनी काही तासातच केला खुनाचा उलगडा


बीड :
आष्टी तालुक्यातील पिंपळखेड येथे खुनाची घटना मंगळवारी (दि.23) दुपारच्या सुमारास घडली होती. अंभोरा पोलीसांनी काही तासातच या प्रकरणाचा उलगडा केला असून बापानेच मुलाचा खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपीला पोलीसांनी अटक केली असून आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

रामदास पांडुरंग चव्हाण (वय 35 रा.पिंपळखेड ता.आष्टी जि.बीड) यांचा त्यांच्याच शेतामध्ये मंगळवारी दुपारी मृतदेह आढळून आला. पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार पांडूरंग केसू चव्हाण (वय 65) असे आरोपीचे नाव आहे. पांडुरंग यांना रामदास हा एकुलता एक मुलगा आहे. रामदासला एक मुलगा व एक मुलगी असून तो मागील अनेक महिन्यापासून गुजरात येथे ट्रकवर चालक म्हणून काम करतो. तो वर्ष-वर्ष घरी येत नव्हता. त्यास दारुचेही व्यसन होते. रामदास यांच्या मुलीचा गावातीलच तरुणाशी प्रेम विवाह झाला. हा विवाह तिच्या आजोबांसह इतर नातेवाईकांच्या संमतीने पार पडला. या विवाहासाठी रामदासचा विरोध होता. कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन झाल्यामुळे रामदास घरी परतला. घरी आल्यानंतर त्यांना मुलीचा विवाह झाल्याचे समजले. त्यामुळे बाप-लेकांमध्ये वाद झाला. परत हरभार विक्री केल्याचे वडीलाकडे पैसे आले होते. या पैशासाठी रामदासने वडीलांकडे तगादा लावला पण पैसे न दिल्यामुळे पुन्हा वाद झाला. याच रागातून मंगळवारी धारदार शस्त्राने पांडुरंग यांनी रामदासचा खून केला. या प्रकरणी अंभोरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि.ज्ञानेश्वर कुकलारे हे करत आहेत.

Tagged