accedent

कारच्या धडकेत एक ठार, दोघे जखमी

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव


माजलगाव दि.2 : कार-दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना माजलगाव तालुक्यातील परभणी रोडवर गुरुवारी (दि.2) रात्री 8 च्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गणेश वसंत डांगे (वय 18) असे मयताचे नाव आहे. तर वसंत डांगे (वय 42) हे अविनाश डांगे (वय 14) सर्व रा.रोशनपुरी ता.माजलगाव) हे गंभीर जखमी आहेत. तिघे बापलेक काही कामानिमित्त माजलगावला आले होते. माजलगावमधील काम अटोपून ते परत रोशनपुरीला दुचाकीवरुन जात असताना परभणी रोडवरील पेट्रोलपंपाजवळ त्यांच्या दुचाकीची व कारची (एमएच-14, इएम-92) समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातामध्ये गणेश डांंगे याचा जागीच मृत्यू झाला. तर वसंत डांगे व गणेश डांगे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बार्शीनाका येथे ट्रकच्या
धडकेत तरुणाचा मृत्यू

बीड : भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत पादचार्‍याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास शहरातील बार्शीनाका येथे घडली.
शेख युसुफ शेख राजू (वय 40, रा. अमेर कॉलनी तेलगाव रोड बीड) असे मयताचे नाव आहे. तो बार्शी नाक्यावर पायी जात असताना सदरील घटना घडली. गंभीररित्या जखमी झालेल्या युसूफ यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले.

Tagged