PubG

भारत करणार पुन्हा चीनवर डिजिटल स्ट्राईक

देश विदेश न्यूज ऑफ द डे

आणखी 47 चिनी अ‍ॅप्स बॅन होणार

चीनच्या कुरापतींना वैतागून भारताला आता कठोर पावलं उचलण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारने पुन्हा एकदा चीनवर डिजिटल स्ट्राईक केला आहे. चीनच्या आणखी 47 अ‍ॅप्सवर भारतात बंदी घातली आहे. याबद्दलचे वृत्त दैनिक प्रभातने दिले आहे. याआधीही टिकटॉकसोबतच शेअर इट, हॅलो, यूसी ब्राऊजर सारख्या 59 चिनी अ‍ॅप्सवर भारताने बंदी घातली होती.

माहितीनुसार, सरकार आता 250 हून अधिक चिनी अ‍ॅप्सची तपासणी करत आहे. यामध्ये पब्जीचाही समावेश आहे. यात युझरच्या प्रायव्हसी किंवा माहितीचे उल्लंघन तर होत नाही आहे ना, याची पाहणी केली जाणार आहे. या बंदी घातलेल्या 47 अ‍ॅप्सची यादी लवकरच जारी करण्यात येणार आहे.

मात्र, यावर गृह मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
दरम्यान, देशाचे सार्वभौमत्व, अखंडत्व यांच्याबरोबरच राष्ट्रीय सुरक्षेसाठी अपायकारक ठरू शकणार्‍या 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालत असल्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने दिली होती. बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅप्समध्ये यूसी ब्राऊजर, हॅलो, लाइकी, क्लब फॅक्टरी, न्युज डॉग, यूसी न्युज, वीबो, जेंडर आदींचाही समावेश आहे. संबंधित अ‍ॅप्स ब्लॉक करण्याची शिफारस केंद्रीय गृह मंत्रालय आणि सायबर गुन्हे समन्वय केंद्राकडूनही करण्यात आली होती.

Tagged