Corona

कोरोना पॉझिटिव्हची संख्या चिंताजनक!

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड


बीड दि.13 : कालच्या दिलासादायक आकडेवारीनंतर आज पुन्हा धडकी भरवणारा आकडा समोर आला आहे. मंगळवारी जिल्हा प्रशासनाला 4 हजार 183 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 1 हजार 18 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर निगेटिव्ह 3 हजार 165 रुग्ण आढळले आहेत. लॉकडाऊन असतानाही कोरोना पॉझिटिव्हचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच आज लॉकडाऊन संदर्भात निर्णय होणार असल्याने याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोरोना रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी

Tagged